भीषण अपघातात कन्नडचे ४ ठार

Foto

औरंगाबाद : बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरजवळ अंजनी (खुर्द) येथे बोलेरो आणि कंटेनरच्या भीषण अपघातात औरंगाबाद जिल्ह्यातील कन्‍नड येथील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली.
या अपघातात मनोहर क्षीरसागर (वय ७०), मेघा क्षीरसागर (वय ३५), नलिनी क्षीरसागर (वय ६६) यांच्यासह बोलेरो जीपचालक सुखदेव नागरे (वय २५) यांचा जागीच मृत्यू झाला.

कन्‍नड येथील क्षीरसागर परिवार त्यांच्या मुलासाठी मुलगी पाहायला गेले होते. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम उरकून वाशिम येथून औरंगाबादकडे परत येत असताना नागपूर औरंगाबाद मार्गावर मेहकरनजीक (अंजनी खुर्द) येथे त्यांच्या बोलेरो गाडीची कंटेनरला जोरदार धडक बसली. शनिवारी मध्यरात्री हा अपघात घडला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतांना जवळील सरकारी रुग्णालयात दाखल केले. मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात हे मृतदेह ठेवण्यात आले आहेत. 15 एप्रिलला याच ठिकाणी स्कॉर्पिओ आणि ट्रकचा भीषण अपघात झाला होता. त्या अपघातात महू येथून परतत असताना जुमडे कुटुंबातील पाच जण जागीच ठार झाले होते.